दुष्काळात तेरावा महिना, वीज बिल थकल्याने पाणी अडवले

March 1, 2013 10:20 AM0 commentsViews: 37

01 मार्च

दुष्काळानं होरपळणार्‍या मराठवाड्यातील जालना शहरातील नागरिकांना दुष्काळात तेरावा महिना अशा अनुभवाला सामोरं जावं लागतंय. शहरात पाणीटंचाई असताना नगर परिषदेने वीज बिल न भरल्याने वीजवितरण कंपनीने जालना शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शहागड पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी उपलब्ध असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. खरंतर शहराला पाणी पुरवठा योजनेमुळे थोडं पाणी उपलब्ध करुन देण्यात आलंय, पण नगर परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे पाणी मिळत नाही. तब्बल 39 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील 20 लाख रुपये वीज बिल गुरूवारीच भरल्याचा दावा नगराध्यक्षांनी केला आहे पण पाणी पुरवठा अजून सुरू झालेली नाही.

close