केंद्राने उद्योजकांना नव्हे तर उद्योगांना पाठिंबा द्यावा -राय

February 8, 2013 10:27 AM0 commentsViews: 7

08 फेब्रुवारी

मोठ मोठे घोटाळे उघड करणार्‍या कॅगच्या विनोद राय यांनी केंद्र सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने उद्योगांना पाठिंबा दिला पाहिजे उद्योजकांना नव्हे, असा टोला त्यांनी लगावला. हावर्ड विद्यापीठातील एका परिसंवादात त्यांनी हे मत व्यक्त केलंय. फक्त संसदेत रिपोर्ट मांडणं हे कॅगचं काम नव्हे तर देशाच्या जनतेप्रती आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे असंही ते म्हणाले. या भाषणात त्यांनी मोठमोठ्या घोटाळ्यांचे संदर्भ देत भांडवलशाहीशी लढणं हे आपलं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं.

close