बिल्डर हत्या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशलिस्ट अमोलिक अटकेत

February 18, 2013 9:10 AM0 commentsViews: 13

19 फेब्रुवारीनवी मुंबईत बिल्डर सुनीलकुमार लोहारीया हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. धक्कादायक म्हणजे त्या हत्याप्रकरणी एन्काऊंटर स्पेशलिस्ट अमोलिक यांना आज सकाळी नवी मुंबईतूनच अटक करण्यात आली. त्यांच्यासह पोलिसांनी आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक केली आहे. सुनीलकुमार यांच्यावर गोळी झाडणार्‍या व्यंकटेश शेट्टीयार याला जमावानं पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. यानंतर शेट्टीयार याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी रविवारी आणखी चार आरोपींना अटक केली. यात सुनीलकुमार यांच्यावर चॉपरनं वार करणारा वाजीद कुरेशीसह आणखी दोघांना मुंब्रा भागातून अटक करण्यात आली आहे. तसेच सुनीलकुमार लोहारीया हत्याप्रकरणाचा कट एक महिन्यापूर्वीच रचन्यात आला होता अशी माहिती आता पुढे येत आहे. आरोपी सुरेश बिजनानीच्या माध्यमातून हा कट रचण्यात आला होता, असंही समजतंय. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

कोण आहे सॅम्युअल अमोलिक?

- 1982-83 : मुंबई पोलीस दलात PSI म्हणून रूजू- 1992 : मुंबई क्राईम ब्रँचला नेमणूक- 1992 : बाबू नावाच्या गुंडाला बनावट चकमकीत ठार केल्याचा आरोप- 2003 : गुंड बाबू याच्या बनावट चकमक प्रकरणी पोलीस दलातून निलंबित- सहा महिन्यानंतर मॅटअंतर्गत पुन्हा पोलीस दलात वर्णी- 2006 : API म्हणून बढती, नवी मुंबई क्राईम ब्रँचमध्ये बदली- नवी मुंबईतील बिल्डर सुरेश बिजलानी यांचा बॉडिगार्ड म्हणून कार्यरत- 2009 : पोलीस इन्स्पेक्टर म्हणून बढती- 2010 : मुंब्रा इथल्या कौसा भागात एन्काऊंटर, चकमकीवरून पुन्हा वाद2011 : पोलीस इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त

close