रायगडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, 4 जण जखमी

February 8, 2013 10:32 AM0 commentsViews: 40

08 फेब्रुवारीरायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातल्या बोरली गावात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहे. जखमींना मानगावमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. बिबट्याने लोकांवर हल्ला केल्यानंतर गावातल्या एका घरामध्ये दडी मारलीय. हे घर गावकर्‍यांनी बाहेरून बंद केलंय. घटनेच्या ठिकाणी वनाधिकारी आणि पोलीस पोचले आहे. आणि बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोरलीसारख्या समुद्र किनार्‍याजवळच्या गावात बिबट्यानं हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे.

close