अशोक चव्हाणांकडून मराठवाड्याला मोठी अपेक्षा

December 7, 2008 5:02 AM0 commentsViews: 16

7 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकडविलासराव देशमुख पायउतार झाल्यानंतर उद्योगमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर, विलासराव देशमुख यांच्यानंतर मराठवाड्यातून मुख्यमंत्री पदावर जाणारे अशोक चव्हाण हे मराठवाड्यातले चौथे नेते. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आणिबाणीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. शंकरराव चव्हाण हे फेब्रु. 1975 ते मे 1977, आणि दुसर्‍यांदा मार्च 1986 ते जून 1988 पर्यंत मुख्यमंत्री होते. शिवाजीराव निलंगेकर यांनी जून 1985 ते मार्च 1986 दरम्यान कारभार सांभाळला. विलासराव देशमुखांनीही पहिल्यांदा ऑक्टो. 1999 ते जाने. 2003, तर दुसरी टर्म ऑक्टो. 2004 ते नोव्हे. 2008 अशी विक्रमी कारकीर्द सांभाळली. आणि आता अशोक शंकरराव चव्हाण यांच्या खांद्यावर डिसेंबर 2008 पासून महाराष्ट्राची धुरा सोपवण्यात आली आहे.निलंगेकर गुणवाढ प्रकरणात अडकले , तर मुंबईवरचा हल्ला आणि ताज पिकनिक प्रकरणावरून विलासरावांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. अत्यंत विदारक अशा दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडे देण्यात आलीय. मराठवाड्यातले एक मुख्यमंत्री अपयशी ठरल्यानंतर अत्यंत अल्पकाळासाठी पण खडतर आव्हानात्मक परिस्थितीत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आलीय. त्यामुळे हा काटेरी मुकुट आता अशोक चव्हाणांना मोठी कसरत करतच सांभाळावा लागणार आहे.

close