शिर्डीत दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

February 6, 2013 10:08 AM0 commentsViews: 3

06 फेब्रुवारी

शिर्डीजवळ 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. या दोघी सख्या बहिणी आहेत. याप्रकरणी याच गावातील राहणार्‍या सुभाष गायकवाड आणि विकास गांगुर्डे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अल्पवयीन मुलींना शिर्डीहून कोपरगावकडे जाताना अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या दोघांनी लिफ्ट दिली आणि त्यांना फूस लावून कोपरगावला नेलं. संध्याकाळी कॉलीस गाडीतून औरंगाबाद रस्त्याकडे नेऊन गाडीतच त्यांच्यावर बलात्कार केले. या दोघा नराधमांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

close