वाळू माफियाचा पोलीस कॉन्स्टेबलला ट्रक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

March 1, 2013 11:11 AM0 commentsViews: 75

01 मार्च

जळगांव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये अवैध वाळू वाहतूकदारांची माफिया'गिरी' राजरोसपणे सुरू आहे. ही वाहतूक रोखणार्‍या पोलीस हवालदाराच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याची घटना चाळीसगावात घडली आहे. या घटनेत हा हवालदार गंभीर जखमी झाला आहे. महेन्द्र पाटील असं या जखमी पोलीस हवालदाराचं नाव आहे. जखमी पोलिसाला तातडीनं नाशिकला उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 14 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. पण संशयित आरोपी फरार झाले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

close