विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा 145 मतदारसंघांवर दावा

March 8, 2013 3:56 PM0 commentsViews: 8

08 मार्च

विधानसभेसाठी राष्ट्रवादीने 145 मतदार संघांवर दावा केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ठिकाणी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाल्या, अशा 145 जागांवर राष्ट्रवादीनं दावा केला आहे. प्रदेश राष्ट्रवादीचे समन्वयक वसंत वाणी यांनी ही घोषणा केलीय. अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो का या प्रश्नावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही वाणी म्हणाले. तसेच शरद पवारांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी तयार करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. त्यासाठी गरज पडली तर उपोषण करण्याची तयारीही त्यांनी दाखवलीय.

close