अझीम प्रेमजींनी संपत्तीतले 50 टक्के केले जनसेवेसाठी दान

February 20, 2013 4:53 PM0 commentsViews: 76

20 फेब्रुवारी

लोककल्याणाच्या कामांमध्ये नेहमीच आघाडीवर असणारे विप्रोचे प्रमुख अझीम प्रेमजी यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी आपल्या एकूण संपत्तीतला अर्धा वाटा समाजकार्यासाठी दान केला. वॉरेन बफेट आणि बिल गेट्ससारख्या जगभरात ख्याती असलेल्या उद्योजकांनी सुरू केलेल्या 'गिव्हिंग प्लेज' उपक्रमात प्रेमजीही सहभागी झाले आहे. या उपक्रमात सहभागी होणार्‍या उद्योजकांना आपल्या संपत्तीतला मोठा वाटा जनसेवेसाठी दान करावा लागतो. आता अझीम प्रेमजीसुद्धा या उपक्रमात सहभागी झाले आहे. प्रेमजी यांनी अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचं काम सुरू केलंय. त्यासाठी त्यांनी 9 हजार कोटी रुपये दिले आहे. शिवाय स्वत:च्या खाजगी शेअर्समधले जवळपास 9 टक्के शेअर्ससुद्धा समाजकल्यासाठी दान केले आहे. युरोप, अमेरिकेपेक्षा भारतात लोकसेवेसाठी भरीव मदत करणारे फार कमी आहेत. अशा वेळी प्रेमजी यांचं हे पाऊलं सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

close