रेल्वे बजेटवर महाराष्ट्राचे खासदार संतापले

February 26, 2013 11:09 AM0 commentsViews: 18

26 फेब्रुवारी

रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी आज सादर केलेल्या रेल्वे बजेटवर महाराष्ट्रातले खासदार चांगलेच संतापले आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे खासदार नाराज आहेत. संसदेत सेंट्रल हॉलमध्ये बिगरकाँग्रेस खासदारांची बैठक होणार आहे. राज्यातील खासदार पहिले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासोबत ही बैठक घेणार आहे आणि नंतर पवनकुमार बन्सल यांना भेटायचं असं खासदारांनी ठरवलंय. या बजेटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फारसं काही देण्यात आलेलं नाहीय. फक्त 2 नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे खासदारांसोबतच मुंबईकरही नाराज आहेत.

close