भरधाव मर्सिडीजने पाच जणांना उडवले

February 18, 2013 9:20 AM0 commentsViews: 10

29 फेब्रुवारी

मुंबईत अंधेरी पश्चिम भागात रविवारी रात्री एक वाजता एका भरधाव मर्सिडीज कारने पाच जणांना धडक दिली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहे. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहे. तर दोन जणांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. या अपघातानंतर कार ड्रायव्हर फरार झाला. आता मिळालेल्या माहितीनुसार ही मर्सिडीज गाडी सापडली आहे. त्या गाडीचा नंबर एम एच 04 एफ ऐ 2520 असा असून गाडी मालकाचा शोध सुरु आहे. ही गाडी वर्साेवा पोलीस स्टेशनला आणण्यात आली आहे.

close