सोलापूरला पाण्यासाठी राज्य सरकारची कर्नाटकला मागणी

March 4, 2013 3:52 PM0 commentsViews: 11

04 मार्च

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट या भागामध्ये पाण्याची उपलब्धता कमी होतेय. त्यामुळे या भागासाठी अलमट्टी धरणामधून पाणी उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारकडे केली आहे. यासंदर्भात पुण्यामध्ये आज कर्नाटक सरकारचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली.

फेब्रुवारी महिन्यात कर्नाटकनं आवर्तन सोडणं आवश्यक होतं, पण ते सोडलं गेलं नाही. ही बाबही कर्नाटकमधल्या अधिकार्‍यांच्या लक्षात आणून देण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातल्या बंधार्‍याचं पाणी कर्नाटक मधले काही शेतकरी शेतीसाठी वापरत असल्यानं त्यावर निर्बंध आणावेत अशी मागणीही सरकारतर्फे आज करण्यात आली. सध्या उजनी धरणामध्ये असलेला साठा पुरेसा नाही. त्यामुळे या भागासाठी पाण्याची आवश्यक्ता आहे. त्यामुळे अलमट्टी मधुन 2 टीएमसी पाणी सोलापूर भागासाठी उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केली आहे. पुण्यामध्ये आज कर्नाटक सरकारचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या अधिकार्‍यांमध्ये बैठक पार पडली. त्यानंतर विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी ही माहिती दिली. अलमट्टी पासून पाणी पोहोचवण्यासाठी साधारण 175 किमीचा टप्पा कॅनॉल मधून पार करावा लागणार आहे. त्यामुळे त्यातल्या तांत्रिक अडचणींचाही आढावा घेतला जाईल असंही कर्नाटकच्या अधिकार्‍यांनी सांगितलं.अधिकारी आणि कर्नाटक सरकारमध्ये चर्चा झाल्यानंतर आता या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.

close