पुण्यात 23 व्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सुरुवात

December 7, 2008 5:25 AM0 commentsViews: 1

7 डिसेंबर, पुणे23 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली आहे. मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत आहे. जगभरातील 50 हजार स्पर्धक यात सहभागी झालेत. यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धकांबरोबरच अपंग स्पर्धकांनीही भाग घेतलाय.मुंबईवर झालेल्या अतिकेरी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहुन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. शांततेसाठी दौड, असा संदेशही ते यावेळी देणार आहेत. बीजिंग ऑलिम्पिकचा ब्राँझ मेडल विजेता विजेंदर कुमार आणि सिनेस्टार प्रियांका चोप्रानं झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात केली. त्याचबरोबर या मॅरेथॉनला सेलिब्रेटीजचीही प्रचंड उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, भारताचा अव्वल स्विमर वीरधवल खाडे, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॉलिवुड अ‍ॅक्टर राहुल बोस आणि प्रियांका चोप्रा या सर्वांनी या मॅरेथॉनला उपस्थिती लावली.या मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदवणार्‍या खेळाडूला यावेळी दोन लाखांचं विशेष बक्षिसही देण्यात येणार आहे. दहशतवादी हल्ल्यांची कृत्य लक्षात घेता या मॅरेथॉनला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

close