कोल्हापुरातील रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला

March 12, 2013 11:01 AM0 commentsViews: 15

12 मार्च

कोल्हापूर : इथं गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेला रिक्षा चालकांचा संप अखेर आज मिटला. ईलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीविरोधात हा संप सुरु होता. राज्य सरकारने ई मीटरची सक्ती केली मात्र ते महाग असल्यामुळे परवडण्यासारखे नाही अशी भूमिका घेत रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला होता. कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी आणि नेत्यांनी वर्गणीतून ई मीटर देण्याचं मान्य केल्यानं रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. शहरात 6 हजार रिक्षा असून एका रिक्षाला ई मीटरसाठी 3 हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे मीटरचा खर्च हा कोट्यवधी रुपये आहे. मात्र आत्तापर्यंत रिक्षा चालकांकडे 50 लाख रुपये जमा झाल्याचं रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलंय.

close