होय, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत घोटाळा झाला-चिदंबरम

February 26, 2013 1:37 PM0 commentsViews: 5

26 फेब्रुवारी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीत घोटाळा झाल्याची कबुली खुद्द अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे. काही अपात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली गेली तर काही गरजवंत शेतकर्‍यांना मात्र ती मिळू शकली नाही. हे दुदैर्वी आहे, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. याबद्दल चौकशी केली जाईल आणि अपात्र शेतकरी आणि त्यांना कर्ज देणार्‍या बँकांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना स्पष्ट केलंय. याविषयीचा कॅगचा अहवाल तयार झाला असून तो लवकरच संसदेत मांडला जाईल असंही त्यांनी सांगितलं.

close