मुंबईत दोन कारमध्ये जोरदार टक्कर

March 12, 2013 12:00 PM0 commentsViews: 1

12 मार्च

मुंबई : येथील विलेपार्ले भागात पहाटे 2 वाजता दोन गाड्यांमध्ये जोरदार टक्कर झाली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विलेपार्ले जवळ पहाटे 2 वाजता भरधाव वेगात बोरिवलीकडे जाणारी इंडिगो कारच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हायवेवर असणार्‍या डिवायडरला तोडून समोरून येणार्‍या होंडा सिटी गाडीला जाऊन धडकली. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहे. या जखमींना उपचारासाठी वी.एन.देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. इंडिगोचा ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवत होता का याचा पोलीस तपास करत आहे.

close