धोणीच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ

December 7, 2008 7:57 AM0 commentsViews: 1

7 डिसेंबर, झारखंडझारखंड सरकार अखेर एकदाचं जागं झालंय. भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणी याच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट टीम निवडीच्या बैठकीसाठी धोणी सुरक्षा रक्षकांशिवाय रांची एअरपोर्टला गेला होता. पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल धोणी फारसा समाधानी नव्हता. याप्रकरणी मीडियातूनही सोरेन सरकारवर टीका करण्यात आली होती. अखेर झारखंडचे मुख्यमंत्री शिबु सोरेन यांनी झाल्या प्रकाराची दखल घेतलीय आणि धोणीला झेड प्लस सिक्युरिटी देण्याचं आश्वासन दिलं आहे. सुरक्षा पुरवण्यात कोणाची चुक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही सोरेन यांनी सांगितलंय.

close