दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवठा करणारे टँकरच गळके

March 1, 2013 2:14 PM0 commentsViews: 75

01 मार्च

दुष्काळग्रस्त गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जातो. पण, गावाला मंजूर झालेल्या क्षमतेपेक्षा दोन हजार लीटर कमी पाणीच गावात पाठवलं जातं आणि त्यातही टँकर गळके असतात. खुलताबादमधल्या 12 पेक्षा जास्त गावांना ज्या गिरीजा मध्यम प्रकल्पातून टँकर भरले जातात. पण, या टँकरना झाकणच नसतं. गावात जाण्यासाठी तब्बल 16 किलोमीटरचा रस्ता पार करावा लागतो. शिवाय रस्ताही खराब. त्यामुळे टँकरमधून बरच पाणी वाया जातं. जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही टँकरची दुरुस्ती होत नसल्याची तक्रार सरकारच्या टँकर चालकांनी केली आहे.

close