‘विशालयुती’ला राज ठाकरेंचा ‘टाटा’

March 9, 2013 9:42 AM0 commentsViews: 10

09 मार्च

पुन्हा एकदा एका वर्तमानपत्रातून टाळी आली मी तिला दुपारी 'टाटा' केलं. दुसरा काही उद्योग आहे की नाही, जे ह्या गोष्टी करत आहे त्या मला कळत नाही. यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करा सारखे काय खिडकीतून डोळे मारतात. मी कोल्हापूरच्या सभेतही तेच सांगितले होते आणि आजही तेच सांगतो या महाराष्ट्रात मनसेची सत्ता स्वबळावरच आणणार असा निर्धार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहातल्या मेळाव्यात त्यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केलं.

रतन टाटा घरी आले हा तुमचा बहुमान

प्रख्यात उद्योगपती रतन टाटा शुक्रवारी घरी आले होते. संगळ्याने भेटले पण हे विसरू नका हा बहुमान तुमचा आहे. एकट्या राज ठाकरेचा नाही. रतन टाटा हे काही कारण नसतांना कुठेही जात नसतात. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला टाटांची भेट ही मी शुभ संदेश समजतो अशी भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

मतदार याद्यांतून नाव गायब कशी ?मतदार याद्यांतून मराठी लोकांना वगळण्यात येतं आहे. त्यांची नाव माझ्याकडे आहे. ज्यात ती 85 टक्के आहे. आपली मानसं निवडून येऊ नये यासाठी हा खटाटोप सुरू आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला.

===================================================

'ग्रेट भेट'मध्ये नरेंद्र जाधव….पाहण्यास विसरू नका आज रात्री 9.30 वा. रविवारी दुपारी 12 वा आणि 5 वा. फक्त आयबीएन लोकमतवर

===================================================

close