निजामकालीन खजाना विहीर आटली

March 12, 2013 12:06 PM0 commentsViews: 95

12 मार्च

बीड : येथील निजामकालीन खजाना विहीर आहे. ही विहीर साडेचारशे वर्षांपूर्वी बांधलेली आहे. यावर्षीचा दुष्काळ इतका भीषण आहे की गेल्या साडेचारशे वर्षांत पहिल्यांदाच ही विहीर कोरडी पडली आहेत. यातूनच बीडमध्ये दुष्काळी परिस्थिती किती गंभीर आहे, याची कल्पना येते. शेतकर्‍यांना कधीच पाण्याचा तुटवडा होऊ नये, यासाठी 1572 साली निजामाचा सरदार सलाबत खान यानं ही विहीर बांधून घेतली होती. बिंदुसरा नदीच्या पायथ्याशी ही विहीर बांधल्यामुळे यातलं पाणी आजपर्यंत कधीच आटलं नव्हतं. पण यंदाच्या दुष्काळात विहीर पूर्णपणे आटलीय.

close