मंत्रालयाला लागलेली आग आटोक्यात

March 9, 2013 10:06 AM0 commentsViews: 15

09 मार्च

राज्याचा गाडा हाकला जाणार्‍या मंत्रालयाची इमारती पुन्हा एकदा आगीने होरपाळून निघाली. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागलेली आग आता आटोक्यात आली आहे. आगीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. पण आग लागण्याची वर्षभरातली ही दुसरी घटना आहे. चौथ्या मजल्यावर नूतनीकरणाचं काम सुरू आहे. तिथं लावलेल्या केमिकलमुळे ही आग लागल्याचा अंदाज राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया व्यक्त केला आहे. मागिल वर्षी जून महिन्यात मंत्रालयाच्या इमारतीला आग लागली होती. या आगीत 3 मजले जळून खाक झाली होती. यामध्ये उपमुख्यमंत्र्यांची केबिन, मुख्यमंत्र्यांची केबिन आणि लाखो फाईल जळून खाक झाल्या होत्या. मागिल वर्षी लागलेल्या आगीचे कारण अजूनही स्पष्ट होऊ शकले नसताना मंत्रालयात आज पुन्हा एकदा आगीच्या धुराने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

close