हिंगोलीत दलित तरूणाची जाळून हत्या

March 9, 2013 10:14 AM0 commentsViews: 9

09 मार्च

हिंगोली : येथील कानरखेडामध्ये एका दलित तरुणाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. मुकबधीर असलेला 23 वर्षांचा सतीश भगत 9 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला.या प्रकरणी पोलिसांनी अट्रॉसिटी कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. पण सतीशची हत्या म्हणजे नरबळी आहे. आणि पोलिसांनी सतीशचा भाऊ सुनीललाच आरोपी करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस योग्य रितीने तपास करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर तपास योग्य दिशेनं होत असून नरबळीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, सतीशच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री, मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.

close