दिल्ली गँगरेप:आरोपींना मारण्याचा रचला होता कट !

March 12, 2013 1:18 PM0 commentsViews: 14

12 मार्च

दिल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंग आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळणं मिळालं आहे. राम सिंग यांच्यासह उर्वरीत आरोपींना मारण्याचा कट तिहार जेलमध्ये रचला जात होता हे तपासातून उघड झाले आहे. तिहार जेलमध्ये वापरलेल्या मोबाईल फोनच्या रेकॉर्ड्सवरुन आरोपींना मारण्याचा कट रचला जात होता ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनीही आरोपींच्या जीवाला धोका होता या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

राम सिंगने सोमवारी सकाळी तिहार जेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. स्वत:च्या कपड्यांनी राम सिंगनं गळफास लावून घेतला. पहाटे 5 वाजता 3 नंबरच्या बॅरेकमध्ये त्याचा मृतदेह आढळला. गळफास लावण्यासाठी ग्रिलच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी राम सिंगनं प्लॅस्टीकच्या बादलीचा वापर केला होता. गंभीर बाब म्हणजे रामसिंगला बरॅकमध्ये इतर 2 कैद्यांबरोबर ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राम सिंगने फाशी घेतली तेंव्हा ते दोन कैदी काय करत होते असा सवाल उपस्थित झाला. त्यातच आज पोलिसांनीच आरोपींच्या जीवाला धोका आहे याला दुजोरा दिला आहे.

आरोपींची तुरूंगातच हत्या करण्याचा कट रचला जात होता याबद्दल फोन कॉल्सचे पुरावे हाती लागले आहे. या तुरूंगात खून खटल्यातील आरोपी सौम्या विश्वनाथन हा जेलमध्ये मोबाईल फोन वापरत होता. तर अमित शुक्ला हाही आरोपी दिल्लीतील अनेक लोकांशी बोलत होता.

पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्सवरुन सामुहिक बलात्कार घटनेतील आरोपींना कशा प्रकारे मारता येईल याबद्दल तिहारमधून जानेवरीत अनेक फोन केले गेले होते. या रेकॉर्ड्सवरुन आरोपी कोर्टात नेले जात असताना त्यांना मारण्याचा कट रचल्या जात होता. पोलीस अधिकार्‍यांना आरोपींच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दल कल्पना देण्यात आली होती. पण तरी सुद्धा पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली. आरोपींना दुसर्‍या तुरुंगात का हलवले नाही असा सवाल विचारला जात आहे.

close