मुंबई विमानतळावर राणेंचं जोरदार स्वागत

February 19, 2009 2:51 AM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारी मुंबईकाँग्रेसमधलं निलंबन रद्द झाल्यानंतर राणे दिल्लीहून मुंबईत परतले आहेत. काल रात्री मुंबई विमानतळावर समर्थकांनी राणेंचं जोरदार स्वागत केलं. पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारू अशी भूमिका नारायण राणे यांनी जाहीर केली आहे. निलंबित झाल्यानंतर राणेंनी चारवेळा दिल्लीच्या वा-या केल्या. शेवटी चौथ्या फेरीत त्यांना यश आलं. निलंबन रद्द झाल्यावर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. संध्याकाळी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

close