न्यूझीलंड दौ-यासाठी टीम इंडिया मुंबईहून रवाना

February 19, 2009 3:21 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी मुंबईसध्या फॉर्मात असणारी टीम इंडिया आता किवींशी दोन हात करण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाली आहे. काल रात्री उशिरा टीम इंडिया मुंबई विमानतळावरून न्यूझीलंडकडे रवाना झाली. त्यापूर्वी टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीनं मुंबईत पत्रकार परिषद घेतली. न्यूझीलंड दौ-यासाठी टीम पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास धोणीनं यावेळी व्यक्त केला.न्यूझीलंड दौ-यात भारतीय टीम पाच वनडे, तीन टेस्ट आणि दोन टी-20 च्या मॅच खेळणार आहे. दौ-याची सुरवातच टी-20 मॅचनी होणार आहे. यातील पहिली 20-20 ची मॅच येत्या 25 फेब्रुवारीला ख्राईस्टचर्च इथं तर दुसरी मॅच 27 तारखेला वेलिंग्टनमधल्या वेस्टपॅक स्टेडिअमवर खेळवण्यात येईल. तर पहिली वनडे रंगेल 3 मार्चला नेपिअरमध्ये आणि दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर म्हणजेच 6 मार्चला वेलिंग्टनमध्ये दुसरी वन डे खेळली जाईल. यानंतर 8 मार्च, 11 मार्च आणि 14 मार्चला तिसरी, चौथी आणि पाचवी वन डे रंगेल. 18मार्चपासूनच भारत-न्यूझीलंडदरम्यानच्या पहिल्या टेस्टला सुरुवात होईल.

close