पुण्यात उभारली जागतिक दर्जाची शूटिंग रेंज

December 7, 2008 9:18 AM0 commentsViews: 5

7 डिसेंबर पुणेस्नेहल शास्त्री युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी करोडो रुपये खर्चून जागतिक दर्जाची शूटिंग रेंज उभाण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवतनं पुढाकार घेत तेथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचं मिशन हाती घेतलं आहे.सद्या या शूटिंग रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, प्रशिक्षक विश्वजीत शिंदे आणि त्यांचे सहकारी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्याशूटिंग रेंजमधील उपकरणं कशी हाताळायची याचं प्रशिक्षण घेत आहेत. स्वित्झर्लंडच्या सीयुस कंपनीचे तंत्रज्ञ त्यासाठी त्यांना खास प्रशिक्षण देत आहेत. ही तांत्रिक प्रणाली एकदा समजावून घेतल्यानंतर परदेशी तंत्रज्ञांना वारंवार इथं बोलवण्याचा खर्च वाचवायचा हा प्रयत्न आहे. या शूटिंग रेंजचा वापर आता हायटेक कोचिंगसाठी हे खेळाडू करणार आहेत.अंजलीनं त्यादिशेनं पहिलं पाऊल टाकलं.

close