फ्रायडे रिलीज

February 19, 2009 3:16 PM0 commentsViews: 5

19 फेब्रुवारी, मुंबई सिनेमा बॉलिवुड असो वा हॉलिवुड. दोन्ही फॅन्ससाठी हा आठवडा एकदम खास आहे. कारण या आठवड्यात टॉम क्रूझचा वॅल्केरी, ऑस्कर नॉमिनेटेड ' मिल्क ' आणि ' दिल्ली – 6 ' हे तीन ऑप्शन्स आहेत. ' दिल्ली -6 ' या सिनेमाीची कहाणी आहे ती रोशनची. आणि हा रोशन अभिषेक बच्चननं साकारला आहे. रोशन हा एनआरआय असून पहिल्यांदाच भारतभेटीवर आलेला असतो. खासकरून आपल्या आजीला भेटायला आलेला असतो. जुन्या दिल्लीतल्या गल्ल्यांगल्यांमध्ये फिरताना त्याला इथल्या संस्कृतीची ओळख होत जाते. आणि इथेच त्याला भेटते बिट्टू (सोनम कपूर ) जिला संस्कारांच्या जोखडातून मुक्त व्हायचं असतं. ए.आर.रेहमानच्या एकापेक्षा एक गाण्यांनी या सिनेमाची चांगलीच हवा निर्माण केलीये आणि महत्त्वाचं म्हणजे यात अमिताभ बच्चनचा सरप्राईझ रोलही आहे. दुस-या महायुध्दाच्या काळात हिटलरच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. हा कट खुद्द जर्मन अधिका-यांनीच रचला होता. हीच वॉल्क्री या सिनेमाची कथा आहे. जी सत्य घटनांवर आधारित आहे. या कटाच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक आहे कर्नल क्लॉस वॉन स्टॉफनबर्ग, आणि हा रोल साकारलाय टॉम क्रूझने..ब्रायन सिंगरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आठवड्यातला आणखी एक महत्त्वाचा सिनेमा म्हणजे मिल्क. कारण या सिनेमाला मिळाली आहेत 8 ऑस्कर नॉमिनेशन्स मिळालेली आहेत. कॅलिफोर्नियामध्ये गे अधिकारी पहिल्यांदाच निवडून येतो, पण आपल्या समलिंगी संबंधांबद्दल जाहीर चर्चा केल्यामुळे त्याची हत्या केली जाते. अशी या मिल्क सिनेमाची कथा आहे. या गे अधिका-याची भूमिका केलीये सीन पेननं. ख-या सिनेमारसिकांसाठी खरंतर हे तीनही सिनेमे सारखेच महत्त्वाचे आहेत. त्यातले कुठले बघायचे की सगळे बघायचे तो चॉईस तुमचा.

close