लख्वी आणि शाहला चौदा दिवसांची कोठडी : डॉन टीव्हीचा दावा

February 19, 2009 4:44 PM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी, रावळपिंडी मुंबई हल्ल्यातले मास्टरमाईंड झकी-उर-रहमान लख्वी आणि झरार शाह यांना चौदा दिवसांची कोठडी देण्यात आली. पाकिस्तानमधल्या डॉन टीव्हीनं हा दावा केलाय. लख्वी आणि शाह यांना रावळपिंडीतल्या तुरुंगात पाठवण्यात आल्यातं डॉन टीव्हीनं म्हटलंय. या दोघांना पाकनं अटक केलीय की नाही याबाबतच अजूनपर्यंत गोंधळ होता. पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी डिसेंबरमध्येच या दोघांना ताब्यात घेतल्याचं सांगितलं होतं. पण, गेल्याच आठवड्यात पाकिस्ताननं सहा जणांना अटक केली. त्यात या दोघांचा समावेश होता की नाही याबाबत पाकिस्ताननं खुलासा केला नव्हता.

close