पाक दाखवतंय पुन्हा जुने रंग

February 19, 2009 5:07 PM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारी मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या तपासात भारताला सहकार्य करण्याची भूमिका घेणार्‍या पाकनं पुन्हा जुने रंग दाखवयला सुरुवात केली आहे. दाऊद इब्राहिम आणि जैश-ए-महंमदचा सूत्रधार मसूद अझर पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा पाकचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केलाय. अशा गुन्हेगारांना पाकिस्तान थारा देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. मात्र गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मसूदला ताब्यात घेतल्याची माहिती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी भारतीय मीडियाला दिली होती. पण यानंतर परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनीही अझर पाकिस्तानला हवा असल्याचं सांगत त्याच्या अटकेचा इन्कार केला होता.

close