सोमनाथ चटर्जी यांनी खासदारांना फटकारलं

February 19, 2009 5:16 PM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारी संसदेत खासदारांचा धिंगाणा आता नेहमीचीच गोष्ट बनलीय. खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागतं. जनतेच्या पैशाची अशा पद्धतीनं उधळपट्टी करणार्‍या खासदारांना लोकसभेचे सभापती सोमनाथ चटर्जी यांनी आज फटकारलं. जनतेचा एक पैसासुद्धा तुमच्यावर खर्च करण्याची लायकी नाही, अशा कडक शब्दांत चटर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदस्य सभागृहाला ओलिस ठेवत आहेत, असं ते म्हणाले.

close