नागपूर विद्यपीठात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केली तोडफोड

February 20, 2009 8:17 AM0 commentsViews: 1

20 फेब्रुवारी, नागपूर प्रशांत कोरटकर नागपूर विद्यापीठात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागारा आंदोन छेडलं. वसतीगृहाची नगारा आंदोलन करून विद्यापीठाची तोडफोड केली. वसतिगृहाच्या दयनीय अवस्थेवर अजूनही तोडगा काढला नसल्यामुळं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात घुसून तोडफोड केली. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकत्यांनी कुलगुरूंच्या विरोधात घोषणाही दिल्यात. एका महिन्यांपूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या परिसराची तोडफोड केली होती. वस्तीगृहाच्या वाईट परिस्थितीची जाणीव कुलगुरूंना करून देण्यासाठी विद्यापीठाच्या परिसरात तोडफोड केली होती. त्यानंतर कुलगुरू एस.एन.पठाण यांनी आठ दिवसात निर्णय करू अस आश्वासन दिल होतं. पण आजवर यावर काहीच झालं नाही म्हणून पुन्हा या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात नगारा आंदोलन करून विद्यापीठात तोड फोेड केली. नागपूर विद्यापीठाच्या वसतिगृहाची हालत प्रचंडप्रमाण खालवली आहे. वसतिगृहातल्या पाणी आणि वीज या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. येणा-या उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या पाहता वसतिगृहाची शक्य तेवढ्या जवकर दुरूस्ती व्हावी ही विद्यार्थ्यांची इच्छा आहे. पण कुलगुरुंच्या टोलवा टोलवीच्या उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटत आहे. विद्यार्थ्यांना कायदा हाती घ्यावा लागत आहे. यावरून विद्यापीठाच्या प्रशासनात काही घोळ असल्याचंही लक्षात येत आहे.

close