शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक : भाजपसोबतच्या युतीवर चर्चा होणार

February 20, 2009 8:32 AM0 commentsViews: 3

20 फेब्रुवारी, मुंबई शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक मुंबईत बोलावण्यात आलीय. पश्चिम मुंबईत जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोडवर मातोश्री क्लब इथं ही बैठक होतेय. या बैठकीत निवडणूक तयारी बरोबरच भाजपसोबतची युती तोडली तर काय होईल याची चाचपणी करण्यात येणार असल्याचं समजतं. या बैठकीसाठी राज्यातल्या जिल्हाप्रमुखांना बोलावण्यात आलंय.त्याशिवाय वरिष्ठ शिवसेना नेतेही हजर असतील. या बैठकीत काय चर्चा होणार आहे याबाबत गुप्तता पाळली जातेय. बैठकीत मोबाईल फोन नेण्यास जिल्हाप्रमुखांचे मनाई करण्यात आलीय.

close