शेतक-यांनो आता कर्जमाफी पुरे – शरद पवार

February 20, 2009 2:50 PM0 commentsViews: 6

20 फेब्रुवारी, सांगली शेतकर्‍यांनी यापुढं कर्जमाफीची मागणी करू नये असं आवाहन खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलंय. सांगलीमध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कर्जमाफीच्या बातम्या जशा येऊ लागल्या तसतशी बँकांच्या कर्जवसूली कमी होऊ लागली, आता यापुढे कर्जमाफीची मागणी नको अशी विनंती शरद पवारांनी काल कार्यकर्त्यांना केली. सांगलीत शरद पवारांच्या हस्ते विवीध कार्यक्रमांचं उद्घाटन झालं. तसंच विकास मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकर्‍यांसाठी जाहीर झालेल्या 71 हजार कोटी रूपये इतक्या मोठ्या रकमेची तरतूद जर विकासकांमावर झाली असती तर शेतकरी कर्जबाजारी झालाच नसता, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

close