लोडशेडिंग विरोधात उदयनराजे भोसलेंचे आंदोलन

February 20, 2009 2:56 PM0 commentsViews: 77

20 फेब्रुवारी, सातारामाजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी लोडशेडिंग विरोधात कोयना धरण ताब्यात घेण्याचं आंदोलन केलं. शेकडो कार्यकर्त्यांसोबत कोयनेच्या दिशेनं जाणार्‍या उदयनराजे भोसले यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. सातारा जिल्हा भारनियमन मुक्त करण्यासाठी उदयनराजे यांनी भूमाता मोहीम हाती घेतलीय. सातार्‍याच्या अजिंक्यतारा ते कोयना धरण अशी ही मोहीम होती. राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या मोहिमेमुळं वाहतूक खोळंबली होती.

close