अंबानी बंधू एकत्र

February 24, 2009 12:00 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारीअनिल आणि मुकेश या दोन अंबानी बंधूमधली तेढ जगजाहीर आहे. पण हे दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत. एका घरगुती कार्यक्रमानिमित्त हे दोघं भाऊ एकत्र येत आहेत. निमित्त आहे ते त्यांची आई कोकीलाबेन अंबानी यांच्या पंचाहत्तरीचं.या प्रसंगी दोन्ही भावांमधला दुरावा कमी होईल अशी शक्यता वर्तवली जातेय. गेल्या दोन महिन्यात अनेकांनी अनिल आणि मुकेश अंबानींना तीन वेळा एकाच कार्यक्रमात उपस्थित असलेलं पाहिलं गेलंय. पण खास घरगुती सोहळ्यासाठी म्हणून 2005सालानंतर पहिल्यांदाच अनिल आणि मुकेश अंबानी एकत्र भेटणार आहेत.

close