सीमाप्रश्नावर सगळ्यांनी एकत्र यावं – भुजबळांचं आवाहन

February 24, 2009 12:19 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी, कोल्हापूर प्रताप नाईक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी गटतट विसरून एकत्र आलं पाहीजे तरच हा वाद मिटेल, असं मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. ते कोल्हापुरातील सीमापरिषदेत बोलत होते. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यानं सीमाप्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईल, असंही भुजबळ म्हणाले. महाजन आयोगानं महाराष्ट्रावर अन्यायच केलाय अशी टीकाही भुजबळांनी यावेळी केली.कोल्हापूरमध्ये सीमाप्रश्नावर बोलताना भुजबळ कंटाळलेले दिसले. " गेली 52 वर्षं सीमाप्रश्नाचं घोंगडं भीजत पडलं आहे. गटातटांतलं राजकारण विसरून एकत्र आल्याशिवाय सीमाप्रश्न मार्गी लागणार नाही, असं वैतागून छगन भुजबळ म्हणाले. " माझ्या राजीनाम्यानं जर सीमा प्रश्न सुटत असेल तर तोही मी द्यायला तयार आहे, ' असंही भुजबळांनी सांगितलं. सीमापरिषदेत भुजबळांनी महाराष्ट्र एकिकरण समितीतल्या फुटीवरही टीका केली. "आता फुटीचं राजकारण पुरे असं सांगत, भुजबळांनी या समितीच्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती केली.

close