हा मार्ग धोक्याचा – आरपीएफची रेल्वेअपघात जागरुकता मोहीम सुरू

February 24, 2009 2:31 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी, मुंबई रोहिणी गोसावीमुंबईत रेल्वे अपघातात दररोज सरासरी दहा लोकांचा मृत्यू होतो आणि तितकेच लोक जखमी होतात. हा मार्ग धोक्याचा या कॅम्पेन अंतर्गत आयबीएन लोकमत मुंबईकरांमध्ये या विषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आरपीएफनेही आता एक कॅम्पेन सुरू केलं आहे.एरवी रेल्वेस्टेशन फक्त पहारा देण्याचं काम करणारेआरपीएफचे पोलीस रेल्वे प्रवाशांना पॅम्प्लेट्स देऊन ते रेल्वे अपघातांविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सीएसटी रेल्वेस्टेशन आणि त्यांच्या हद्दीत येणार्‍या रेल्वेस्टेशन्समध्ये त्यांचं अपघातांविषयी जागृरुकता हे कॅम्पेन सुरूआहे या अपघातांची गंभीरता इतकी आहे तर ती लक्षात घेऊन आमच्या वरिष्ठांनी हा उपक्रम राबवण्याचं छरवलं आहे, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिली. या कॅम्पेनमध्ये आरपीएफचे पोलीस प्रवाशांना भेटून त्यांना सूचना देतात. प्रवाशांना रेल्वे अपघातांचं गांभीर्य लक्षात आणून दिलं जातं. प्रवाशांनाही आरपीएफचा खासा उपक्रम आवडत आहे. आरपीएफ आणि रेल्वे पोलीस हे नेहमीच जनतेच्या रोषाचे बळी ठरलेले आहेत. पण रेल्वे अपघात कमी करण्यासाठी त्यांनी सुरू केलेले हे प्रयत्न जनतेच्या मनातली त्यांची ही इमेज बदण्यास मदत करतील. आरपीएफनं सुरू केलेलं हे कॅम्पेन रेल्वे अपघात कमी करण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. या कॅम्पेन अंतर्गत आरपीएफनं जवळपास 2000 पॅम्प्लेट्स वाटले आहेत. त्यापैकी 100 लोक जरी जागृत झाले तरीही हे अपघात मोठ्या प्रमाणावर कमी होतील असा त्यांना विश्वास वाटतोय. आरपीएफनं सुरू केलेल्या कॅम्पेनच्या यशाची खात्री त्यांना असली तरीही त्या सूचना लोक किती गंभीरतेनं पाळतात यावरंच त्याचं यश अवलंबून आहे.

close