मार्केट वॉच

February 24, 2009 2:33 PM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय शेअरमार्केट्समध्ये जोरदार घसरण झाली आहे. पण भारतीय शेअरमार्केट्ससाठी तिसर्‍या बूस्टर पॅकेजनं बाजू सावरून धरलीये. मार्केट बंद होताना सेन्सेक्समध्ये रिकव्हरी बघायला मिळाली आणि सेन्सेक्स बंद होताना त्यात फक्त एकवीस अंशांची घसरण दिसली. अखेरीस सेन्सेक्स होता 8 हजार 822 अंशांवर तर निफ्टी होता 2 हजार 733 अंशांवर. निफ्टीमध्येही फक्त 2 अंशांची घसरण झाली. महिंद्रा ऍन्ड महिंद्रा, रॅन्बॉक्सी, ग्रासीम , डेल हे आजच्या दिवशी टॉप गेनर्स आहेत. तर एचडीएफसी, टाटा स्टील, सन फार्मा, स्टरलाइट इंडिया हे आजच्या दिवशीचे टॉप लूझर्स आहेत.

close