सरकारी बँकांच्या व्याजदारात कपात होईल – प्रणव मुखर्जी

February 24, 2009 2:35 PM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी एक्साईज ड्यूटीमध्येही दोन टक्क्यांची कपात करण्यात आलीये. ही घट 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आल्याचं मुखर्जी यांनी सांगितलं.येत्या काही दिवसांत सरकारी बँकाना व्याजदरात आणखीन कपात करावी लागेल असं दिसतंय कारण प्रत्यक्ष प्रणव मुखर्जी यांनीच अशी सूचना केलीय. सरकारनं बँकांना भरपूर प्रमाणात चलनपुरवठा केलाय, असं प्रभारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज स्पष्ट केलंय. भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका मंदीमुळे बसलाय. त्यामुळेच मरगळलेल्या इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरला उत्तेजन देण्यासाठी आज सरकारनं नव्या बूस्टर पॅकेजची घोषणा केलीय.अंतरिम बजेटवर आज लोकसभेत झालेल्या चर्चेत बोलताना त्यांनी ही घोषणा केलीये. या बूस्टर पॅकेजनुसार एक्साईज ड्यूटी 2% कमी करण्यात आलीय. या पॅकेजनुसार आता एक्साईज ड्यूटी 8 टक्के असणार आहे आणि ही घट 31 मार्चपर्यंत लागू असणारेय. यामुळे टी.व्ही, फ्रिज, बाईक, कारच्या किंमती स्वस्त होऊ शकतात. सर्व्हिस टॅक्समध्येही 2% घट करण्यात आलीय. सर्व्हिस टॅक्स आता 10% असेल. त्यामुळे यापुढे क्रेडिट कार्डवर शॉपिंग आणि हॉटेलिंग करणं स्वस्त होऊ शकेल. कमर्शिअल रेंटल प्रॉपर्टीचे दरही कमी होतील. तसंच सिमेंटच्या एक्साईज ड्यूटीतही 2% घट केली गेलीय. सिमेंटवर आता एक्साईज ड्यूटी 8% असेल.

close