पुण्यात मर्सिडिजचा नवा प्लान्ट सुरू

February 24, 2009 10:37 AM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारी, पुणे अमृता दुर्वे मर्सिडिज बेंझ कंपनीच्या पुण्यातल्या नव्या प्लान्टचं अनावरण मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. यावेळी कंपनीचे इतर उच्च अधिकारी आणि पिंपरीच्या महापौर अपर्णा डोके हे ही उपस्थित होते. पुण्याजवळ चाकण एमआयडिसी परिसरातला हा प्लान्ट वर्षभरात उभारण्यात आलाय. सुमारे शंभर एकर जागेवर उभारलेला हा प्लान्ट अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. प्रदूषण होऊ नये यासाठी विशेषरित्या काळजी घेऊन हा परिसर विकसित करण्यात आलाय. इथं वर्षाला अंदाजे पाच हजार गाड्यांची निर्मिती करणार असल्याचं कंपनीनं सांगितलंय. तसंच परदेशात विकल्या जाणार्‍या मर्सिडिजच्या इतर गाड्यांसाठीचे सुटे पार्ट्सही इथं बनवण्यात येणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील तरुणांना नवीन संधी देणार्‍या अशा प्रोजेक्ट्सचं स्वागतचं आहे असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

close