शहाबुद्दीन शेखादम खांडवावाला : गुजरातचे नवे डीजीपी

February 24, 2009 4:10 PM0 commentsViews: 5

24 फेब्रुवारी शहाबुद्दीन शेखादम खांडवावाला यांनी गुजरातच्या पोलीस महासंचालकपदाची सूत्रं स्वीकारली. पी. सी. पांडे यांच्याकडून त्यांनी सूत्रं हाती घेतली. पोलीस आणि लोकांमधले संबंध दृढ करणं, हेच आपलं महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं शहाबुद्दीनं यांनी सांगितलं. त्याचबरोबर लोकसभा निवडणुका सुरळीतपणं पार पाडणं आणि राज्यात मरीन कमांडोंची स्थापना या गोष्टी त्यांच्या अजेंड्यावर आहेत. शहाबुद्दीन हे गुजरातचे पहिलेच मुस्लीम डीजीपी आहेत.

close