सुखराम यांच्या शिक्षेची सुनावणी लांबणीवर

February 24, 2009 3:45 PM0 commentsViews: 3

24 फेब्रुवारी माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांच्या शिक्षेची सुनावणी सीबीआयच्या स्पेशल कोर्टानं पुढं ढकललीय. त्यांना आता उद्या शिक्षा जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सुखराम यांना कोर्टानं गेल्या शुक्रवारी दोषी ठरवलं होतं. सीबीआयनं सुखराम यांना 7 वर्षांच्या कैदेची शिक्षा मागितलीय. 1991 ते 1995 या काळात सुखराम यांनी 5 कोटी 36 लाख रुपयांची मालमत्ता जमवल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुखराम यांनी या निकालाला आव्हान देणार असल्याचं सांगितलंय. सुखराम यांच्या दिल्लीतल्या बंगल्यात सीबीआययनं छापा टाकला होता. त्यावेळी उशीच्या कव्हरमध्ये पावणे तीन कोटींची रोख रक्कम सापडली होती.

close