झारखंडमधील चकमकीत 3 गावकरी ठार

December 7, 2008 1:33 PM0 commentsViews: 2

7 डिसेंबर झारखंडझारखंडमधील दुमका जिल्हात भूसंपादनावरून गावक-यांत आणि पोलिसांमध्ये जोरदार हिसंक चकमक झाली.या चकमकीत 3 गावकरी ठार झाल्याची माहिती आहे. तर 3 पोलिसांसह 9 जण जखमी झाले आहेत. पोलिसांतर्फे केवळ एकाचं गावक-याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं आहे. आरपीजी कंपनीनं दुमका जिल्ह्यातील काठी कुंड भागात विद्युत प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत एक करार केला. मात्र या भागातील नागरिकांनी या प्रोजेक्टसाठी आपल्या जमिनी देण्यास विरोध दर्शवला.काल पोलिसांनी संघर्ष समितीच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली. या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी दोन ते तीन हजार लोकांनी मोर्चा काढला. या दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली.आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अश्रूधुरांचे नळकांडे फोडले. त्याचदरम्यान आंदोलकांनीही पोलिसांवर बाणांनी हल्ला चढवला.

close