राष्ट्रीय लोक दलाची भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी

February 24, 2009 4:09 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी उत्तरप्रदेशात अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोक दलानं भाजपशी निवडणूकपूर्व आघाडी केलीय. अजित सिंग यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांची सोमवारी भेट घेतली. राष्ट्रीय लोक दलाचं उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागात भक्कम स्थान आहे. बागपत, मुझफ्फरनगर, मथुरा आणि अमरोहा यासह सात जागा अजित सिंग यांना मिळण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत आरएलडीची समाजवादी पक्षाशी आघाडी होती. आता समाजवादी पक्ष काँग्रेसच्याजवळ गेल्यानं आरएलडीनं भाजपशी हातमिळवणी केलीये.

close