युनिस खानची ट्रिपल सेंच्युरी

February 24, 2009 3:51 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारीयुनिस खाननं पाकिस्तानच्या कॅप्टनपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ट्रिपल सेंच्युरी झळकावली.मुथ्थया मुरलीधरनच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीपद्वारे चिकी रन्स काढत त्याने ट्रिपल सेंच्युरी पूर्ण केली. त्याच्या नाबाद 306 रन्सच्या मॅरेथॉन खेळीत 27 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. ट्रिपल सेंच्युरी झळकावणारा तो पाकिस्तानचा तिसरा बॅटसमन ठरला. यापूर्वी हनीफ मोहम्मद आणि इंजमाम उल हक यांनी पाकिस्तानतर्फे ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. युनिसच्या ट्रिपल सेच्युरीच्या जोरावर पाकिस्तानने चौथ्या दिवस अखेर 5 बाद 574 रन्सपर्यंत मजल मारली. श्रीलंकेनं पहिल्या इनिंगमध्ये 644 रन्स केलं आहेत.पाकिस्तान श्रीलंकेमधली ही टेस्ट मॅच ड्रॉ होण्याची चिन्हे आहेत.

close