एचडीएफसी प्रीपेमेंट चार्ज लावणार

February 24, 2009 2:30 PM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारीहोमलोन घेतलेल्या ग्राहकांच्या खिशाला आता टाच बसू शकते. एचडीएफसी बँकेनं त्यांचं होमलोन दुस-या बँकेत वळवणा-या ग्राहकांना प्रीपेमेंट चार्ज लावण्याचा निर्णय घेतलाय. बँक अशा ग्राहकांना आता 2 ते 3 टक्के चार्ज लावेल. सरकारी बँकांकडे कमी दरात होमलोन घेणं फायद्यात पडत असल्यामुळे , अनेक ग्राहक चालू असलेलं खाजगी बँकांचे लोन्स रद्द करत आहेत. त्यामुळेच एचडीएफसी बँकेनं होमलोनवर प्रीपेमेंट चार्ज लावण्याचा हा निर्णय घेतलाय. एसबीआयनं एका वर्षासाठी 8 टक्के दरानं होमलोन उपलब्ध करुन दिल्यामुळे खाजगी बँकांना मोठी स्पर्धा निर्माण झालीय.

close