शिवसेनाप्रमुखांनी टाळली अडवाणींची भेट

February 25, 2009 5:36 AM0 commentsViews: 2

25 फेब्रुवारी मुंबईमुंबईतल्या सत्कार समारंभानंतर एअर पोर्टवर जाताना भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट मागितली. पण शिवसेनाप्रमुखांनी ही भेट नाकारली असं समजतंय. बाळासाहेब विश्रांती घेत असल्यामुळे अडवाणींनी त्यांना उठवू नये असं सांगितल्याचं समजतंय. पण अडवाणींनी अगदी ऐनवेळी भेट मागितल्यानं, बाळासाहेबांनी नकार दिल्याचीही चर्चा आहे. लालकृष्ण अडवाणींचा कार्यक्रम जर आधीच ठरला होता, तर मग बाळासाहेबांची भेट अगदी ऐनवेळी का मागण्यात आली. कदाचित त्यावरूनच शिवसेनाप्रमुख चिडले असावेत, असं सेनेच्या नेत्यांना वाटतंय.

close