भारताचं न्यूझीलंडसमोर 163 रन्सचं टार्गेट

February 25, 2009 7:48 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीख्राईस्टचर्च इथं सुरू असलेल्या टी-20 मॅचमध्ये भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 163 रन्सचं आव्हान ठेवलंय. सुरेश रैनाचे नॉटआऊट 61 रन्स हे भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. गौतम गंभीर आऊट झाल्यावर तिस-याच ओव्हरमध्ये रैना बॅटिंगला आला. परंतु दुस-या बाजूने पटापट विकेट जात असताना त्याने शांत डोक्याने बॅटिंग केली. त्याने 36 बॉल्समध्ये हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यात 5 सिक्स आणि 2 फोर मारले. रैना सोडून इतरांनी मात्र निराशा केली. मोठे शॉट्स खेळण्याच्या नादात ते आऊट झाले. सेहवाग 26, युसुफ पठाणने 20 आणि हरभजनने 21रन्स केले.

close