नरेंद्र मोदींची प्रचार मोहीम सुरू

February 25, 2009 4:59 AM0 commentsViews: 3

25 फेब्रुवारीलोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपनं आघाडी घेतली आहे. बुधवारी मुंबईत भाजपनं लालकृष्ण अडवाणींना निवडणूक निधी देत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली.

आज गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी नरेंद्र मोदी यांची गोंदियात दुपारी जाहीर सभा होणार आहे. तर त्यानंतर संध्याकाळी नाशिकमधल्या पिंपळगावमध्ये दुसरी सभा होणार आहे. राज्यात युतीबाबत प्रश्नचिन्ह असताना मोदींनी मात्र आपली प्रचार मोहीम जोरात सुरू केली आहे.

close