डेक्कन ओडीसीची पुढची बुकिंग रद्द

December 7, 2008 1:54 PM0 commentsViews: 3

7 डिसेंबर ऋतुजा मोरे मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटन क्षेत्राचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे. या हल्यात सापडलेल्या काही परदेशी नागरिकांनी डेक्कन ओडीसीतून प्रवासाची मजा लुटली पण त्याच डेक्कन ओडीसीची पुढची बुकिंग्ज मात्र रद्द झाली आहेत.राजा बार्कले आणि त्यांचा ग्रुप डेक्कन ओडीसीतून महाराष्ट्रदर्शन करून मुंबईत परतला. पण हे सगळेच मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ओबेरॉय हॉटेलमध्ये अडकले होते. राजा बार्कल कॅनडातील नागरिक पर्यटक म्हणून आलेले मुंबईतील हल्ल्याबाबत ते सांगतात, एका अतिरेक्याला आम्ही छोट्याशा खिडकीतून गोळ्या झाडताना पाहिलं. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे आम्ही फार घाबरलो होतो.त्यानंतर एक ग्रेनेड फेकल्याचा मोठा आवाज झाला. आम्हाला माहितही नव्हतं की आम्ही जगू की नाही. पण काही वेळानंतर अचानक सगळंच शांत झालं. आम्ही बचावलो. याच ग्रुपच्या नॅन्सी स्पॉर्ट सांगतात, अशा प्रकारचे हादसे होत असतात. भारतात झाले तसे ते इतर देशातही होऊ शकतात.पण त्यामुळे आपण थांबायचं नसतं. आम्ही खूप एन्जॉय केलं. भारत खूप सुंदर देश आहे.मला इथली संस्कृती आवडली.यासगळ्यांनी डेक्कन ओडीसीची मजा लुटली. तसंच या संपूर्ण ग्रुपनं डेक्कन ओडीसीतून प्रवास केल्याचा आनंद डेक्कन ओडीसीच्या अधिका-यांनाही झाला. तसंच काही दिवसांत या दहशतवादी हल्ल्याचा विसर पडेल. या दोन दिवसांत हे लोकं मायदेशात परत जातीलही. पण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ह्या नंतरच डेक्कन ओडीसीच बुकिंग रद्द झालंय. आधीच तोट्यात असलेल्या डेक्कन ओडीसीला परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आता नव्या ट्रिक्स योजाव्या लागतील.

close